नाशिकरोड येथे राहणारे रमेश वैद्य यांनी येथील पुरुषोतम इंग्लिश स्कूलमध्ये १९६३ मध्ये खेळायला सुरुवात केली. स्थानिक सामने अनेक होत असत आणि क्रिकेटपटूला अधिक महत्व प्राप्त होत असे. हे पाहून वैद्य यांनी आपण क्रिकेटपटू व्हायचे हे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे नील हॉवं आणि सर सीफिल सोबर्स यांना आपले आयडॉल मानण्यास सुरूवात केली. त्यांनी स्थानिक स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरूवात केली. आंतरशालेय सामन्यात त्यांनी अजिंक्यपदही प्राप्त करून दिले. अष्टपैलू खेळ करणारे रमेश वैद्य यांचे नाव शहराबरोबरही एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून घेण्यात येऊ लागले. त्यानंतर ते अनंत कान्हेरे मैदानावरही सरावास येऊ लागल्याने एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्यांच्याकडे बघण्यात येऊ लागले. वैद्य है उजव्या हाताने गोलंदाजी हाताने फलंदाजी करीत असत.
शालेय जीवनात महाराष्ट्राच्या शालेय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. यावेळी लंडनचा शालेय संघ भारत दौन्यावर आला होता. महाराष्ट्राच्या शालेय संघातून खेळतांना रमेश वैद्य यांनी लंडन शालेय संघाचा सलामीवीर लेकॉक याचा त्रिफळा उडवला. हा सामना पुण्याच्या हिराबाग मैदानावर झाला होता. आजचे नेहरू स्टेडियम म्हणून ओळखले जाते. या सामन्यात वैद्य यांनी अहपैलु कामगिरी करत नाबाद २६ धावाही केल्या.
त्यानंतर एथपीटी कॉलेजकडून खेळतांना इंटर कॉलेज स्पर्धेत सर्वाधिक धावा त्यांच्या नावावर लागल्या. त्यांनी पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करून सर्वाच लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतले. वैद्य यांची पुणे विद्यापीठाच्या संघात सतत तीन वर्षे निवड झाली. याच वेळी त्यांना स्पोर्टस् कोट्यातून यु.कां. बँकेत नोकरीही लागली. ऑल इंडिया बैंक स्पर्धेत सतत खेळण्याची संधी मिळत गेली
नाशिक जिल्हा क्रिकेट संघात त्यांनी सतत १७ वर्षे आपला सहभाग नोंदवला. या दरम्यानच्या काळात काळात त्यांनी कर्णधारपदही भूषविले. है कर्णधारपद त्यांच्याकडे तीन वर्षे राहिले. १९८०-८१ मध्ये त्यांचे रणजी सामन्यात पदापर्ण झाले.
महाराष्ट्राकडून खेळतांना मुंबईविरुद्धया नांदेड येथील सामना त्यांच्यासाठी मोहा होल मिळालेल्या संधीचा फायदा उठवायचा असे त्यांनी ठरवले. या सामन्यात वैद्य यांनी सोलकर यांचा बेतलेलाई चांगलाच गाजला. अद्यापही नाशिककरांच्या स्मृतीत हा झेल आहे. याच दरम्यान वैद्य हे अशोक म सुत गावकर, रॉजर बित्री, सैय्यद किरमणी गुंडप्पा विश्वनाथ या ज्येष्ठ खेळाडूंबरोबरही ते खेळले.
वय वाढले तरी रमेश वैद्य यांचे क्रिकेटवरील प्रेम कमी झाले नाही बरोबरचे खेळाडू नाशिकवा शिक्षा लावून मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झाले. परंतु वैद्य यांनी नाशिकशी इमान राखत येथेच रहायचे आणि ज्यांनी आपल्याला संधी दिली त्याच शहरवासीयाची क्रिकेटच्या रूपाने सेवा करायची ठरवले. त्यानंतर वैद्य यांनी नाशिक जिल्हा संघाचे प्ररिककम्हणून सतत पाच वर्ष काम केले. महाराष्ट्राच्या अंडर-१६, अडंर-१९ चे व्यवस्थापक म्हणून ते राहिले. महाराष्ट्रच्या निवड समितीवरही त्यांनी काम पाहिले.
२००३ मध्ये महाराष्ट्राचा अंडर-१७ चा संघ इंग्लंडला गेला तेव्हा वैद्य यांच्यावर संघ व्यवस्थापकाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्राच्या संघाने चांगले यश संपादन केले होते, वैद्य यांनी संपूर्ण जीवनच क्रिकेटसाठी वाहून घेतल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सलील आधारकर, अमित पाटील, आशिष ट्रिबीवाला, सुयश बुरकुल, शेखर गवळी हे रणजीपटूही तयार झाले.
रमेश वैद्य यांना कै. सदू शिंदे पुरस्कार २००२ मध्ये तर नाशिक जिल्हा क्रीडा गौरव समितीचा २००३ मध्ये पुरस्कार मिळाला. याचवेळी नाशिक क्रिकेट अॅकॅडमी आणि नाशिक जिल्हा संघटनेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर युको बँक स्पोर्ट संघटनेनेही त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.