नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील उड्डाण पुलावर आज एसटी महामंडळाच्या शहादा डेपोच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती दुरुस्तीसाठी वर्कशॉपकडे नेत असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
बसमध्ये बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना आधीच सुरक्षितरित्या खाली उतरविण्यात आले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.