खमताणे ग्रामस्थांनी नोंदविला डोंगराळे येथील घटनेचा निषेध
खमताणे ग्रामस्थांनी नोंदविला डोंगराळे येथील घटनेचा निषेध
img
दैनिक भ्रमर

खमताणे (चेतन बागुल) :- मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील बालिका अत्याचार आणि खुनाच्या घटनेचा खमताणे ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदविला आहे.

या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी खमताणे ग्रामस्थांनी रस्त्यावर येत निषेध नोंदविला आहे. खमताणे ग्रामस्थांनी शिवछत्रपती स्मारक परिसरातुन संपूर्ण गावात कॅण्डल मार्च काढला. या कॅण्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ व तरुण मंडळी सहभागी झाली होते.

बालकांच्या सुरक्षिततेसाठी समाज सजक झाला पाहिजे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी याप्रसंगी करण्यात आले आहे.दरम्यान डोंगराळे  येथील घटनेचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा आरोपीला फाशीची शिक्षा करावी अशी मागणी याप्रसंगी खमताणे ग्रामस्थांनी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group