सप्तशृंग गडावर घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात; ६ जण ठार
सप्तशृंग गडावर घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात; ६ जण ठार
img
दैनिक भ्रमर

सप्तशृंग गडावर घाटात इनोव्हा गाडी थेट दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून गाडीतील सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सदरील व्यक्ती हे पिंपळगाव चिंचखेड येथील असल्याची माहिती मिळते आहे.

 सप्तशृंगगड येथील गणपती घाटात इनोव्हा कार १००० ते १२०० फुट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान सदर इनोव्हा कारमध्ये एकूण सात प्रवासी होते. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना वाहन (एमएच १५ बीएन ०५५५) खोल दरीत कोसळून अपघात  झाला. तसेच अद्याप मृतदेहांची ओळख पटली नसून, मृतदेह दरीतून बाहेर काढले जात आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

आपत्ती व्यवस्थापनाकडून लागलीच बचावकार्य सुरु करण्यात आले आहे
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group