अडीच लाखांची लाच घेताना नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील घटना
अडीच लाखांची लाच घेताना नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील घटना
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :  फेरफार नोंदी साठी तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागून अडीच लाख रुपये स्वीकारताना सिन्नर येथील नायब तहसीलदार संजय धनगर यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. 

तक्रारदार यांची दोडी शिवारात जमीन असून, या जमिनीच्या फेरफार नोंदीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावावा म्हणून दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र अडीच लाख रुपयांवर तडजोड करण्यात आली. काल रात्री अडीच लाख रुपये स्वीकारताना पथकाने नायब तहसिलदार धनगर यांना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group