नायलॉन मांजामुळे लासलगावात तरुणाच्या चेहऱ्यावर २१ टाके
नायलॉन मांजामुळे लासलगावात तरुणाच्या चेहऱ्यावर २१ टाके
img
दैनिक भ्रमर

उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या वापरावर स्पष्ट बंदी घातलेली असतानाही लासलगाव शहरात ही बंदी केवळ कागदावरच राहिल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे ३० वर्षीय तरुण अक्षय नहाटा याच्या चेहऱ्यावर तब्बल २१ टाके पडण्याइतपत गंभीर जखम झाल्याची धक्कादायक घटना लासलगाव येथे घडली आहे.शहरात नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू असताना पोलीस यंत्रणा नेमकी काय भूमिका बजावत आहे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. एखादी जीवघेणी घटना घडल्यानंतरच कारवाई करायची का? असा प्रश्न विचारला जात आहे.

दत्त मंदिराजवळून दुचाकीवरून जात असताना धारदार नायलॉन मांजा अक्षय नहाटाच्या तोंडाजवळ अडकला. हा मांजा इतका तीक्ष्ण होता की काही क्षणांतच चेहरा रक्तबंबाळ झाला. न्यायालयीन आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असताना पोलिस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संतापजनक आरोप नागरिक व कुटुंबीयांकडून होत आहे.

नायलॉन मांजाची खुलेआम विक्री, साठवणूक आणि वापर सुरू असताना लासलगाव पोलिसांकडून आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिक जखमी होत असताना, पक्षी मृत्युमुखी पडत असताना प्रशासन नेमके काय करत आहे? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

मकर संक्रांतीच्या तोंडावर अशा घटना घडत असताना, प्रशासनाने तातडीने विशेष मोहिमा राबवून नायलॉन मांजाची विक्री थांबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील अपघातांची जबाबदारी प्रशासनावरच राहील, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.

लासलगाव येथील कापड व्यापारी अक्षय नहाटा हा नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाला असून तोंडाजवळ  21 टाके पडले आहे पतंग प्रेमींनी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद घ्यावा मात्र पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू नये असे पतंग प्रेमींना आवाहन करतो अशी प्रतिक्रिया डॉ. योगेश चांडक यांनी दिली.

लासलगाव परिसरात पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ् अनेक नागरिकांना गंभीर दुखापती झालेल्या घटना घडलेल्या आहेत यापूर्वी लासलगाव ग्रामपंचायत पालिकेच्या वतिने मागच्याच वर्षी घातक मांज्यावर बंदी घातलेली आहे त्यासंबंधीच्या कारवाईच्या सुचना देखील दिलेल्या होत्या बंदी असलेल्या मांजा धाग्याचा वापर  करणार्यींवर तसेच मांजा विकणाऱ्यांवर पोलिस स्टेशन मार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group