नारायण बापू नगर येथील पिंटो कॉलनीत व्येश्या व्यवसाय; एकास अटक
नारायण बापू नगर येथील पिंटो कॉलनीत व्येश्या व्यवसाय; एकास अटक
img
Chandrakant Barve

 नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- जेलरोडवरील पिंटो कॉलनीतील फ्लॅट मध्ये सुरु असलेल्या व्यवसायावर छापा टाकून अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने एका पीडित महिलेची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गिरीष मधुसूदन देवळालकर यास अटक केली आहे. 

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिंटो कॉलनीतील गजानन स्पर्श या बिल्डींगमधील एका फ्लॅटमध्ये आरोपी महिलांकडून अनैतिक देहव्यवसाय करून घेत असल्याची माहिती हवालदार गणेश वाघ यांना माहिती मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विश्वास चव्हाणके, प्रविण माळी, हवालदार गणेश वाघ, समिर चंद्रमोरे, प्रजित ठाकुर, वैशाली घरटे, योगेश परदेशी, युवराज कानमहाले, अतुल पाटील यांनी ही कारवाई केली.

आरोपीने पिडीत महिलेकडून स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता अनैतिक देहव्यापार करण्याकरीता भाग पाडले म्हणुन त्याच्या विरूध्द उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group