मालेगाव जन आक्रोश मोर्चाला  हिंसक वळण, पोलिसांचा लाठीचार्ज
मालेगाव जन आक्रोश मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीचार्ज
img
चंद्रशेखर गोसावी
मालेगाव -  मालेगाव मध्ये निघालेल्या जन आक्रोश मोर्चाला हिंसक वळण लागले असून जमावाला काबूत आणण्यासाठी म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे यामध्ये काही जण जखमी झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे . त्यामुळे मालेगाव मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलीसांना अधिक कुमक विविध भागातून पाठविण्यात आली आहे. 

दोन दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे भागामध्ये तीन वर्षीय बालिकेवरती संजय खैरनार नामक सुतार काम करणाऱ्या गावातील 23 वर्षीय युवकांनी अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ती संतप्त भावना निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी तसेच नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले होते या सर्व प्रकरणावरती पोलिसांनी आणि या भागातील लोकप्रतिनिधी असलेले राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी केली आणि त्या चिमुकली वरती अंत्यसंस्कार झाले होते. 

हे सर्व घडत असतानाच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेले होते त्याच्यावरती कारवाई देखील केलेली होती आरोपीला काल गुरुवारी न्यायालयात आणले असता त्यावेळेसही नागरिकांनी तसेच नातेवाईकांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी व घोषणाबाजी केली होती हे सर्व घडत होते त्यावेळी पोलिसांनी या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवून परिस्थिती काबूत आणली होती. 

दरम्यान आज शुक्रवारी सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केलेला होता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते हा मोर्चा अशा वेळेस निघाला ज्यावेळेस मालेगाव मध्ये शुक्रवारी नमाज निमित्य सर्व दुकाने बंद असतात आणि अशाच वेळी बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते हा मोर्चा ज्यावेळी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होता त्यावेळी मोसम पुलाजवळ असलेल्या न्यायालयात जवळून मोर्चा जाताना मोर्चातील संतप्त नागरिक आणि नातेवाईक यांनी न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला. 

त्यावेळी यातील आरोपी संजय खैरनार हा न्यायालयीन कारवाईसाठी म्हणून या ठिकाणी आलेला होता असे सांगण्यात येते त्यामुळे नागरिक संतप्त झाले त्यांनी या ठिकाणी असलेल्या बंद दुकानांवरती लाथ मारली, घोषणा बाजी केली त्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती झाली. अनेक मोर्चामध्ये  नागरिक न्यायालयाच्या गेटमधून घुसण्याचा प्रयत्न करत असताना  यावेळी नागरिकांन आणि पोलिसांमध्ये झटपट झाली संतप्त झालेला जमाव ऐकत नसल्याने पोलिसांनी मोर्चेकर्‍यांवरती लाठी चार्ज केला. यामध्ये काही जण पळापळीमध्ये जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे परंतु पोलिसांकडून अजून पर्यंत याला दुजोरा  दिल्या गेला नाही.

या सर्व प्रकरणी आता मालेगाव मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक सिंधू यांनी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह इतर भागातूनही पोलीस कुमक मागवली असून या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे काही जणांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अजून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रयत्न केले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group