तपोवन वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाची
तपोवन वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाची
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक - तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने १५ जानेवारीपर्यंत अंतरिम स्थगिती दिली असून, न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतीही झाडे तोडू नयेत, असा आदेश जारी केला आहे. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान लवादाने ही महत्त्वाची कारवाई केली.

याचिकाकर्त्यांचे वकील श्रीराम पिंगळे यांनी सांगितले की, झाडे तोडण्यापूर्वी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवणे बंधनकारक असून ती न पाळताच वृक्षतोड सुरू करण्यात येत असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. एकदा तोडलेल्या झाडांचे पुनर्रोपण नीटपणे होत नसल्याचा पूर्वानुभव लक्षात घेता या वृक्षतोडीला विरोध दर्शविण्यात आला आहे.

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन परिसरात ११५० एकरावर साधूग्राम उभारण्याची योजना असून या प्रकल्पासाठी सुमारे १८०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक तसेच अनेक नामवंत व्यक्तींनी विरोध दर्शवला आहे.

अभिनेते सयाजी शिंदे, शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या वृक्षतोडीविरोधात भूमिका घेतली आहे. मनसे आणि ठाकरे गटाकडून स्थानिक पातळीवर आंदोलन छेडण्यात आले असून, तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group