येवला: अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या येवला नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. शहराच्या राजकारणात लोणारी यांच्या विजयाने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत संमिश्र निकाल पाहायला मिळाले. प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे:
शिवसेना: अरबाज अन्सारी, सूरय्या मोमीन, एजाज शेख, शमीम अन्सारी, वकील शेख, मिनाक्षी अलगट, शीतल शिंदे, गणेश शिंदे, पद्माताई शिंदे आणि तृप्ती राजपूत यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व राखले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व तुतारी गट): परवीनबानो शेख, नजमुसर अन्सारी, डॉ. संकेत शिंदे, जयाबाई जाधव, लतीफ जावेद, लक्ष्मीबाई जावळे, प्रवीण बनकर, दीपक लोणारी, पारूल गुजराथी, महेश काबरा, कुणाल परदेशी, गोटू मांजरे आणि चैताली शिंदे हे उमेदवार विजयी झाले.
भाजपा: छाया क्षीरसागर, लक्ष्मी साबळे आणि पुष्पा गायकवाड यांनी कमळ फुलवले.
एकूणच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काटाजोड लढत पाहायला मिळाली असून, मतदारांनी विकासकामांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे