कळवण :- साडेतीन सक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर सुमारे ९० वर्षांची परंपरा असलेली तृतीयपंथियांची छबिना मिरवणुक अतिशय उत्साहात पार पडली.
यावेळी तृतीय पंथीय आखाड्याच्या प्रमुख सलमा गुरु नायक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने ही मिरवणुक पार पडली. सकाळी सर्वप्रथम सर्व तृतीयपंथीनी शिवालय तलावावर जाऊन स्नान केले त्यानंतर धातुपासुन बनवीलेल्या माता सप्तशृंगीच्या मुर्तीस यथोचीत अभीषेक केला. त्यानंतर सर्व अनुयायांनी तृतीयपंथीय आखाड्याच्या प्रमुख सलमान गुरू नाइक यांच्या मार्गदर्शनाने अभिषेक केला.
त्यांनतर धातुपासुन बनवीलेल्या देवीच्या मुर्तीचा साज शृंगार करण्यात आला. व तलाव परिसरात नीम मिरवणुक काढण्यात येऊन सबंध जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. पुढे सर्व अनुयायांनी साज शृंगार करुन ढोल पथकाच्या नादात शिवालय तलावापासुन छबिना मिरवणुकीचा प्रारंभ झाला. सदर मिरवणुकीत सहभागी होत तृतीय पंथीयांनी नृत्य केले तसेच यावेळी मिरवणुक बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
गडाच्या पहिल्या पायरीजवळ यथोचीत महापुजा व महा आरती करुन मिरवमुकीचा समारोप झाला. तसेच आज पहिल्यांदाच सप्तशृंगगडावर तृतिय पंथीयांच्या वतीने यज्ञ करण्यात आला असुन यावेळी देखील विश्व कल्याणाची प्रार्थना करण्यात आली. आज चंद्रग्रहन असल्यामुळे सकाळी छबिना मिरवणुक काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.