नवरात्रीत
नवरात्रीत "या" वस्तू खरेदी करणे शुभ ; घरात सुख शांती अन् समृद्धी नांदेल
img
Dipali Ghadwaje
संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा जल्लोष सुरू आहे. प्रत्येक व्यक्ती देवीची मनोभावे अराधना करत आहे. नवरात्र उत्सवाचा आजचा सहावा दिवस आहे. प्रत्येक दिवशी देवीला नवीन रंगाची साडी परिधान केली जाते. आज लाल रंग आहे. 

नवरात्रीच्या काळात सकाळ-संध्याकाळ आरती आणि मंत्रोच्चार केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते. या दरम्यान जे 9 दिवस उपवास करतात, त्यांच्यावर देवीचा आशीर्वाद राहतो. देवीची पूजा केल्याने घरातील दुःख आणि दारिद्र्य दूर होते. याशिवाय  लवकरच अष्टमी आणि नवमी येत आहे. या काळात देवीची पुजा करताना आपल्या घरी काही ठरावी वस्तू आणणे महत्वाचं असतं. त्याने घरात बरकत येते आणि समृद्धी वाढते. 

चांदीचं नाणं 

नवरात्र उत्सव सुरू असताना या दिवसांत चांदीचं नाणं घेणे शुभ मानलं जातं. यात जर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला घरी चांदीचं नाणं घेऊन याल तर त्याने घरातील समृद्धी आणखी जास्त वाढते असं म्हटलं जातं. तुम्ही चांदीचं नाणं जेव्हा घरी आणता तेव्हा त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो आहे की नाही हे नक्की तपासा आणि मगच ते नाणं घरी घेऊन या. यामुळे घरात सदैव धनलक्ष्मी वर्षाव करते. 

देवीसाठी सौभाग्याचं सामान

अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही देवीला सौभाग्याचं सामान सुद्धा देऊ शकता. यामध्ये मेहंदी, टिकली, कंगवा, बांगड्या, कुंकू, हिरवी साडी, ओढणी अशा विविध वस्तू तुम्ही देवीसाठी खरेदी करू शकता. या वस्तू देवीला दिल्याने त्याने देवीचा आशीर्वाद मिळतो. जी महिला देवीला या वस्तू देते त्या महिलेला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद मिळतो. 


पितळेचा कलश 

हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, पितळेचा कलश म्हणजे धन संपत्तीचं प्रतिक. त्यामुळे अष्टमी किंवा मग नवमीला तुम्ही घरी पितळेचा कलश घेऊन येऊ शकता. पुजेसाठी पाणी लागते आणि हे पाणी ठेवण्यासाठीच तुम्ही या पितळेच्या कलशचा वापर करू शकता. 

मोरपंख 

मोरपंख प्रत्येकाला आवडतो. मोरपंख आपल्याकडे सर्व गोष्टी खेचतो आणि आकर्षित करतो. त्यामुळे तुम्ही मोरपंख खरेदी करू शकता. मोरपंख नेहमी तुमच्या घरातील मंदिरात ठेवावा. मंदिरात मोरपंख ठेवल्याने त्या घरात कायम आनंदाचं वातावरण निर्माण होतं.


 (टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.) 
इतर बातम्या
Join Whatsapp Group