समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; नेमकं काय घडलं?
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; नेमकं काय घडलं?
img
वैष्णवी सांगळे
समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातामुळे हा महामार्ग कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महामार्गावर सगळीकडेच खिळेच खिळे पाहायला मिळत आहे. या खिळ्यांमुळे याठिकाणावरून जाणारी अनेक वाहनं पंक्चर झाली तर काहींचे टायर फुटले. चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी खिळे ठोकल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला होता. पण आता यामागचे खरे कारण समोर आले आहे.

'त्या' मृत्यूचं गूढ उकललं ! एका नर्तकीपायी उपसरपंचानं आयुष्य संपवलं

दरम्यान अनेक लोकांनी गाड्या थांबवल्यानंतर तपासणी केली असता असं लक्षात आलं की ब्रिजवर मोठ्या प्रमाणावर विशिष्ट प्रकारचे खिळे ठोकल्याचे आढळून आलं आहे. प्रथमदर्शनी लोकांना असं वाटलं की चोरट्याने हे खिळे ठोकले असावे आणि गाड्या पंक्चर झाल्यानंतर त्यांना लुटण्याचा त्यांचा हा डाव असावा. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच होती. रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीने हे खिळे ठोकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी आता संबंधित प्रशासन नेमकं काय कारवाई करतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आजचे राशिभविष्य १० सप्टेंबर २०२५ : 'या' राशींसाठी शेअर बाजारातील गुंतवणूक ठरणार फायद्याची

समृद्धी मार्गावर पुलाच्या कामासाठी खिळे ठोकण्यात आले होते. या खिळ्यांमुळे अनेक गाड्यांचे टायर फुटले. त्यामुळे समृद्धी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्री ४ तास समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावर वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. जर पुलाच्या कामासाठी हे खिळे ठोकण्यात आले होते तर समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी बॅरिकेड्स का लावले नाही? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.
high | way |
इतर बातम्या
Join Whatsapp Group