समृद्धी महामार्गावरील अपघातात नाशिक जिल्ह्यातील मृत पावलेल्या व जखमींची नावे आली समोर
समृद्धी महामार्गावरील अपघातात नाशिक जिल्ह्यातील मृत पावलेल्या व जखमींची नावे आली समोर
img
दैनिक भ्रमर

छत्रपती संभाजीनगर (भ्रमर वृत्तसेवा) :- बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन करून नाशिककडे परतत असणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोराची धडक दिली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 5 वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे. तसेच अपघातात 23 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 

मृतांची नावे :- तनुश्री लखन सोळसे ( वय 5, रा. समतानगर, नाशिक), संगीता विलास आठवले (वय 40, रा. वनसगाव, निफाड,नाशिक), अंजाबाई रमेश जगताप (वय 38, रा. राजूनगर, नाशिक), रतन जमदाडे (वय 45, रा. संत कबीर नगर, नाशिक), काजल लखन सोळसे (वय 32, रा. समतानगर, नाशिक), रजनी गौतम तपासे (वय 32, रा. गौळाणे, नाशिक), हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 30, उगाव, निफाड, नाशिक), झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 50, रा. राजूनगर, नाशिक), अमोल झुंबर गांगुर्डे (वय 18, रा. राजूनगर, नाशिक), सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40, रा. राजूनगर, नाशिक), मिलिंद हिरामण पगारे (वय 50, रा. कोकणगाव, ओझर, निफाड, नाशिक), दीपक प्रभाकर केकाणे (वय 47,  रा. पिपळगाव बसवंत).

जखमींची नावे :- पुजा संदीप अस्वले (वय 35, रा. गांधीनगर, नाशिक), वैष्णवी संदीप अस्वले (वय 12, रा. गांधीनगर, नाशिक), ज्योती दीपक केकाणे (वय 35, रा. पिंपळगाव बसवंत), कमलेश दगु म्हस्के (वय 32, रा. राहुलनगर, नाशिक), संदीप रघुनाथ अस्वले (वय 38, रा. जेलरोड, नाशिकरोड), युवराज विलास साबळे (वय 18, रा. इंदिरानगर, नाशिक), कमलबाई छबु म्हस्के (वय 77, रा. ममदापुर, जि. नाशिक), संगीता दगडु म्हस्के (वय 60, रा. गांधीनगर, नाशिक), दगु सुखदेव म्हस्के (वय 50, रा. गांधीनगर, नाशिक), लखन शंकर सोळसे (वय 28, रा. समतानगर, नाशिक), गिरजेश्वरी संदीप अस्वले (वय 10, रा. नाशिक), शांताबाई नामदेव म्हस्के (वय 40, रा. गांधीनगर, नाशिक), अनिल लहानु साबळे (वय 32, रा. गांधीनगर, नाशिक), तन्मय लक्ष्मण कांबळे (वय 8, रा. पिंपळगाव बसवंत), सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन (वय 25, रा. वैजापुर), श्रीहरी दीपक केकाणे (वय 12, रा. पिंपळगाव बसवंत), सम्राट दीपक केकाणे (वय 6, रा. पिंपळगाव बसवंत), गौतम भास्कर तपासे ( वय 38, रा. गौळाणे, नाशिक), कार्तिक लखन सोळसे (वय 5, रा. समतानगर, नाशिक), धनश्री लखन सोळसे (वय 8, रा. समतानगर, नाशिक), प्रकाश हरी गांगुर्डे (वय 24, रा. त्र्यंबकेश्वर), शंकर (वय 3) यांचा समावेश आहे.   

इतर बातम्या
Join Whatsapp Group