मनमाडच्या कुंदलगाव जवळ अपघातामध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
दैनिक भ्रमर
मनमाड (नैवेद्या बिदरी) :- मनमाडच्या कुंदळगाव नजीक इंदौर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर भर रस्त्यात पवनचक्कीचे पाते घेऊन जाणारी मोठी गाडी उभी असल्याने मनमाडहुन मालेगाव कडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला अंदाज आला नाही.
यामुळे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने चालकासह ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला खोल नाल्यात पलटी झाल्याने या अपघातामध्ये पंचवीस वर्षीय ट्रॅक्टर चालक अविनाश बर्डे याचा मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.