नाशिकरोडला आयशरला धडकून तरुणाचा अपघाती मृत्यू
नाशिकरोडला आयशरला धडकून तरुणाचा अपघाती मृत्यू
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी):-वाढदिवसाच्या दिवशी वडनेररोडने दुचाकी वरून विहितगांवकडे येणारा एक तरुण रस्त्यात उभा असलेल्या आयशर गाडीच्या मागील भागावर धडकल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. वडनेर रोड वरील आठवड्यात दुसरा अपघात आहे. 

उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश गोकुळ सोरटे (वय 27, रा. शिव नगर, गुरुकृपा लॉन्स जवळ, वडनेर रोड विहितगांव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज त्याचा वाढदिवस होता.

रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घरी वाढदिवसाची तयारी करून मित्रांना भेटण्यासाठी तो वडनेर रोड वरून विहितगांव कडे आपल्या होंडा कंपनीच्या दुचाकी MH 43 AQ 2266 वरून जात असतांना हंडोरे लॉन्स समोर जनावरांचा खाण्याचा घास भरण्यासाठी उभा असलेल्या आयशार गाडी मागील भागावर जाऊन धडकला. यात तो जबर जखमी झाल्याने त्यास माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचताच वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मयत घोषित केले.

घटनेची माहिती समजताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे घटनास्थळ व रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी आयशार चालक नासिर दादा मिया पानसरे यास ताब्यात घेतले आहे.

वाढदिवसाच्या दिवशी घरातील एकुलत्या एक तरुणाचे अपघाती निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आकाश सोरटे याच्या पशच्यात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. या आठवड्यात या वडनेर रोड वर हा दुसरा अपघात आहे. अधिक तपास उपनगर पोलीस करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group