Nashik : अपघातात सात वर्षीय बालकाचा मृत्यू
Nashik : अपघातात सात वर्षीय बालकाचा मृत्यू
img
Prashant Nirantar


नवीन नाशिक (प्रतिनिधी) :-  दुचाकीवरून जात असताना पुढे असलेल्या चारचाकीच्या दाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर पुढे बसलेल्या सात वर्षीय बालकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी फाटा ते पाथर्डी रोड दरम्यान घडली.  तत्सम राहुल पानपाटील (वय 7, रा. मोंढेनगर, उत्तमनगर, सिडको) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल पानपाटील हे आपल्या मित्राच्या मोटारसायकलवर तत्सम सोबत पाथर्डी फाटा येथून पाथर्डी गावाकडे जात होते. पुजा टेक्सटाईलजवळ आले असता त्यांची दुचाकी एम.एच.15 डी.एम. 1230 या क्रमांकाच्या आय10 गाडीच्या डाव्या दरवाजावर जाऊन आदळली.

या अपघातात तत्समच्या डोक्याला जबर मार लागला. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. औषधोपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group