ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने सायकलस्वार महिलेचा मृत्यू
ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने सायकलस्वार महिलेचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) :- गंगापूर रोडवरून मखमलाबाद रोडकडे सायकलीवरून जाताना झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मखमलाबाद रोडवरील हॉटेल ग्रेप ॲम्बसीजवळ घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की प्रज्ञा आनंद दीक्षित (वय 53, रा. गंगापूर रोड) या दि. 3 मे रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरून मखमलाबादकडे सायकलीवरून जात होत्या. हॉटेल ग्रेप ॲम्बसीजवळ त्या आल्या असता एका डबल ट्रॉली ट्रॅक्टरने ओव्हरटेक करताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का दीक्षित यांना लागल्याने त्या तोल जाऊन खाली पडल्या.

त्यावेळी ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group