भरधाव कारच्या धडकेत तीन वर्षीय मुलीसह सहा गणेशभक्त जखमी
भरधाव कारच्या धडकेत तीन वर्षीय मुलीसह सहा गणेशभक्त जखमी
img
दैनिक भ्रमर

मनमाड (नैवेद्या बिदरी) : मनमाडमध्ये सुसाट कारने दिलेल्या धडकेत गणेश मुर्ती घेण्यासाठी आलेल्या 3 वर्षाच्या चिमुकलीसह 5 ते 6 गणेश भक्त जखमी झाले.

या विचित्र अपघातात रिक्षासह 4 ते 5 दुचाकींचेही नुकसान झाले आहे. नांदगाव रोडवरील गणेश मुर्ती विक्री केंद्रावर समोर हा भीषण अपघात झाला. कार चालक नांदगावचा असून गणेश मुर्ती घेऊन नांदगावकडे जात असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

अपघातानंतर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमींवर मनमाड व मालेगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group