देशातील अनेक रस्ते, महामार्ग आणि वाहनांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आफ्रिकन देश मालीमध्ये एक बस पुलावरून खाली पडल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. नदीवरील पुलावरून बस खाली पडल्याची घटना केनिबा परिसरात घडली. दरम्यान या अपघातात ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखमी झाल्याची माहिती आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात मालीमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आणि १० जण जखमी झाले. बुर्किना फासोच्या दिशेने जाणारी बस देशाच्या दक्षिण-पूर्व भागात असलेल्या पुलावरून खाली नदीत पडल्याने हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार बागो नदी ओलांडणाऱ्या पुलावर हा अपघात २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता झाला. या अपघातात ३१ जण मृत्यूमुखी पडले आहेत, तर १० जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात अतिशय भीषण होता, असं सांगितलं जात आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा झाल्याचे सांगितलं जात आहे.