नांदगावला पहाटे भीषण अपघातात ३ जण ठार तर ४ जण गंभीर; गाडीचा अक्षरशः चुराडा झाला
नांदगावला पहाटे भीषण अपघातात ३ जण ठार तर ४ जण गंभीर; गाडीचा अक्षरशः चुराडा झाला
img
दैनिक भ्रमर
मनमाड (नैवेद्या बिदरी) :- नांदगाव - मनमाड माहामार्गावर आज पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान हिरेनगर फाट्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली.

या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात वाहनाचा अक्षरशः चुरा झाला आहे. हे सर्व मनमाड - नांदगाव रोडवरील आज होणाऱ्या शिवपुराण कार्यक्रमाला येत असल्याची चर्चा होत होती.

या अपघातामध्ये मयत झालेल्यांची नावे समजली नाही. आशा शिवाजी देशमुख (वय 55), विकास शिवाजी देशमुख (वय 35 दोघे रा. मोहाडी), नारायण सुखदेव महाजन (वय 70, रा. पाचोरा), गराबाई अधिक देशमुख (वय 60, रा. मोहाडी) अशी चार जखमींची नावे आहेत. घटनेची महिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.

स्थानिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group