ओव्हरटेक करण्याच्या नादात नगर - मनमाड महामार्गावर २ चार चाकी वाहनांचा भीषण अपघात
ओव्हरटेक करण्याच्या नादात नगर - मनमाड महामार्गावर २ चार चाकी वाहनांचा भीषण अपघात
img
दैनिक भ्रमर
येवला (दीपक सोनवणे) :- आज नगर मनमाड महामार्ग वर हॉटेल साई सावन समोर येवल्याच्या दिशेने येणारी क्रुझर व शिर्डीच्या दिशेने जाणारी किया कार ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.

या अपघातामुळे क्रुजर कार रस्त्यावरच पलटी झाली आहे. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघातामध्ये संतोष गजमल चालक हा गंभीर जखमी झाला असून शेजारी बसलेले सुरज गोसाडे राहणार बीड किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघात घडल्यानंतर हॉटेल साई सावनचे मालक नाजिरभाई शेख यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचारासाठी पाठवले. दरम्यान वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे येवला शहर पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास आता येवला शहर पोलीस करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group