नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांनी केली ''ही'' मागणी ?
नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांनी केली ''ही'' मागणी ?
img
दैनिक भ्रमर



पुणे:  जिल्ह्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी चिमुकलीवर अत्याचार तसेच त्यानंतर तिचा खून करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणात आता सरकार गंभीर पाऊल उचलत असल्याचं पहायला मिळतंय. नसरापूर अत्याचारप्रकरणात सरकारने विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती केली आहे. नसरापूर प्रकरणाची सुनावणी प्रभावीपणे आणि जलदगतीने पार पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

या आरोपीला 12 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असताना आता चिमुकलीच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.नसरापूर प्रकरणातील पिडितेच्या वडिलांनी पुण्यात मुक मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांनी सरकारला लवकरात लवकर न्याय देण्याचं आवाहन केलंय. फक्त माझ्या मुलीसाठी नाही, तर आतापर्यंत ज्या सगळ्या पुण्यात घटना घडल्या त्यासाठी आपण सर्वजण एकत्र झालेला आहे. जिथे स्वातंत्रवीर सावकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथे या लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची होळी व्हावी, अशी इच्छा चिमुकलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.आज आपण शांतता मोर्चा काढला. मात्र अशा मोर्चांनी हिंसेचं वळन होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी, असंही यावेळी चिमुकलीच्या वडिलांनी म्हटलं आहे. आरोपींना कठोर फाशीची शिक्षा करावी, असं निवेदन देखील त्यांनी दिलंय. 11 तारखेला चार्चशीट दाखल होईल, असं पोलिसांनी मला निवेदन दिलेलं आहे, असंही चिमुकलीच्या वडिलांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आता पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास वेगाने पूर्ण करून न्यायालयात पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या आठवड्यात चार्टशीट दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
इतर बातम्या
मोठी बातमी :

Join Whatsapp Group