बारामती : इंदापूर तालुक्यातील लांमजेवाडी जवळ भल्या पहाटे भीषण अपघात झालाय. पहाटेच्या वेळी बारामतीकडून भिगवणकडे निघालेल्या बारामतीतील चार शिकाऊ वैमानिक पायलटच्या चार चाकी वाहनाला भीषण अपघात झाला.
यात दोन शिकाऊ वैमानिक पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झालेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार , दशु शर्मा वय वर्ष 21, आणि आदित्य कणसे वय वर्ष 29 अशी मृतांची नांवे आहेत. तर कृष्णा मंगलसिंग वय वर्ष 21 व महिला पायलट चेष्टा बिश्नोई वय वर्ष 21 वर्षे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.