रिपाईला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली आठवलेंची साथ ; कुणाला होणार फायदा?
रिपाईला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली आठवलेंची साथ ; कुणाला होणार फायदा?
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. ऐन निवडणुकीदरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मोठा धक्का बसला आहे. रिपाईचे महाराष्ट्र सचिव नवीन लादेंनी राजीनामा दिला. लवकरच ते शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत रिपाईचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे निवडणुक काळात याचा रिपाईसोबत महायुतीला मोठा फटका बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन लादे यांनी रिपाईची साथ सोडली आहे. रिपाईचे महाराष्ट्र सचिव नवीन लादेंनी राजीनामा दिला. नवीन लादे यांनी रोजगार आघाडी, माथाडी आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र सचिवपदाचा आणि प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला. सत्तेत असताना कार्यकर्त्यांना सत्ता पदे मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे नवीन लादे यांनी रिपाईमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

नवीन लादे यांचा राजीनामा रिपाई पक्षासाठी मोठा धक्का आहे. लादे यांनी आरपीआय पक्षाचा सर्व पदांचा राजीनामा रामदास आठवले यांना ई-मेलवर पाठवला. नवीन लादे आपल्या ४०० हून अधिक समर्थकांसह येत्या दोन दिवसांत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

त्यामुळे आता ठाकरे गटाची ताकद आणखी वाढणार आहे. नवीन लादे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठं बळ मिळणार आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group