ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहामध्ये मध्यरात्री घुसलं अस्वल ; नेमकं काय घडलं?
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहामध्ये मध्यरात्री घुसलं अस्वल ; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
बुलडाणा शहरातील जिल्हा कारागृहाच्या बाजूला असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहामध्ये शुक्रवारी रात्री अस्वल शिरल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.

वसतिगृहाच्या बाजूलाच जंगल आहे. त्यामुळे या जंगलातूनच हे अस्वल याठिकाणी आले असल्याचे म्हटले जात आहे. याआधी देखील अनेकदा या वसतिगृह परिसरात अस्वल आढळून आले आहे.

शुक्रवारी रात्री ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या चौकीदाराला वसतिगृहाच्या इमारतीमध्ये अस्वल शिरल्याचे दिसून आले. या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ समयसूचकता दाखवत बिल्डिंगचे सर्व दरवाजे बंद करून दिले आणि याची माहिती वन विभागाला दिली. काही वेळातच बुलडाणा वन विभागाचे रेस्क्यू पथक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात पोहोचले. 

सुरुवातीला अस्वलाला पिंजऱ्यात बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे मोठ्या शिताफीने वन विभागाच्या टीमने अस्वलाला डॉटच्या साहाय्याने सकाळी रेस्क्यू केले. त्यानंतर या अस्वलाला अंबाबरबा अभयारण्यात सोडले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group