दोन महिन्यांपूर्वी लग्न अन् पतीची ती भेट ठरली शेवटची, गोड बातमीचा आनंदही अपघाताने हिरावला
दोन महिन्यांपूर्वी लग्न अन् पतीची ती भेट ठरली शेवटची, गोड बातमीचा आनंदही अपघाताने हिरावला
img
Dipali Ghadwaje
अमरावती : लग्न होऊन अवघे दोन महिने सरले होते आणि या संसारात आता एक गोंडास जीव आपल्यासोबत येणार म्हणून डॉक्टर डॉ. पल्लवी कदम या आनंदात होत्या, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. सेमाडोहनजीक नाल्यात खासगी बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये ३२ वर्षीय डॉ. पल्लवी कदम यांचाही मृत्यू झाला. त्यांचा यंदा ११ जुलैला एमआयडीसी परिसरातील रहिवासी राहुल इंगोले यांच्याशी विवाह झाला. आठ दिवसांपूर्वीच या दाम्पत्याला पल्लवी गर्भवती असल्याची गोड देखील समजली होती. त्यामुळे कदम आणि इंगोले है दोन्ही कुटुंबीय आनंदात रममाण झाले होते, परंतु या अपघाताने तो आनंद आणि पल्लवी यांनादेखील हिरावून नेले.

अमरावती येथे चालकाचं नियंत्रण सुटल्याने एक खासगी बस पुलावरुन थेट नदीपात्रात कोसळली होती. या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला होता. तर २५ जण जखमी झाले होते. जखमींपैकी ८ जण अजूनही गंभीर असल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात डॉ. पल्लवी कदम यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून डॉ. पल्लवी या गर्भवती होत्या. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

डॉ. पल्लवी कदम यांचा ११ जुलैला विवाह झाला होता. अमरावती येथील एमआयडीसी येथे राहणाऱ्या राहुल इंगोले यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. तर, जेमतेम आठवड्याभरापूर्वी त्या गर्भवती असल्याचं त्यांना कळालं होतं. पल्लवी गर्भवती असल्याने कदम आणि इंगोले कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. पल्लवी देखील आई होणार असल्याने खूप खुश होत्या. पण, नियतीला त्यांचं सुख बघवलं नाही आणि साऱ्या आनंदावर दु:खाचे काळे ढग पसरले.

डॉ. पल्लवी कदम या आपलं कर्तव्य बजावण्यासाठी खासगी बसने धारणीच्या दिशेने जात होते. तेव्हा धोक्याच्या वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट पुलावरुन नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात डॉ. पल्लवी यांचा मृत्यू झाला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group