नाशिक : वास्तुदोष दूर करण्याच्या बहाण्याने तिघींकडून लाटले सुमारे १७ तोळे सोने
नाशिक : वास्तुदोष दूर करण्याच्या बहाण्याने तिघींकडून लाटले सुमारे १७ तोळे सोने
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : वास्तूदोष काढण्याच्या बहाण्याने ओळखीच्या व्यक्तीने तीन महिलांचे सुमारे 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेत त्यांची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी फाल्गुन भानुभाई पटेल (वय 35, रा. मौनगिरीनगर, हिरावाडी रोड, पंचवटी) हा त्यांच्या ओळखीचा आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये त्याने फिर्यादी महिलेला सांगितले, की मी तुमचा वास्तूदोष काढून देतो. ही पुजा करण्यासाठी तुम्ही तुमचे सोन्याचे व चांदीचे दागिने एका तांदळाच्या डब्यात 15 दिवसांसाठी ठेवून द्या. पटेल हे ओळखीचे असल्याने फिर्यादी महिलेने विश्‍वासाने ते म्हणाले तसे केले. त्यानुसार त्यांनी 25.50 ग्रॅम वजनाचे 5 लाख 55 हजार रुपये किमतीचे दागिने त्यात ठेवले.

हे ही वाचा ! 
मोठी बातमी ! आणखी एका पाकिस्तानी हेराला पकडले, मोबाइलमध्ये सापडले महत्त्वाचे पुरावे

त्यामध्ये 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस, 33 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 1 लाख 25 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची मोहनमाळ, 3.5 ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स, 13.25 ग्रॅम वजनाचे 65 हजार रुपये किमतीचे छोटे मंगळसूत्र, 6.5 ग्रॅम वजनाची 30 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, पाच हजार रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची नाकातली नथ, 40 हजार रुपये किमतीच्या वाटी व आठ ग्रॅम वजनाचे मणी या दागिन्यांचा समावेश आहे. पटेलने दुसर्‍या महिलेला 1 लाख 2 हजार 500 रुपये किमतीचे दागिने त्याच कारणाने तांदळाच्या डब्यात ठेवून घेतले. त्यामध्ये दहा ग्रॅम वजनाचे 50 हजार रुपये किमतीचे नेकलेस, 25 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 2.7 ग्रॅम वजनाचे दहा हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स, 1.5 ग्रॅम वजनाची 7.5 हजार रुपये किमतीची अंगठी, पाच हजार रुपये किमतीचा एक ग्रॅम वजनाचा वेढा, पाच हजार रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची कानातील नथ, हे दागिने दिले.

तिसर्‍या महिलेकडून 1 लाख 85 हजार 500 रुपये किमतीचे दागिने डब्यात ठेवून घेतले. त्यामध्ये 1 लाख 25 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, अडीच हजार रुपये किमतीची 0.5 ग्रॅम वजनाची नाकातली नथ, 0.8 ग्रॅम वजनाची आठ हजार रुपये किमतीची वाटी, 35 हजार रुपये किमतीची सात ग्रॅम वजनाची अंगठी, तीन ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किमतीचे तीन मणी हे दागिने दिले. 15 दिवसांनंतर तिघींनी डबे उघडून पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. डब्यात तांदूळच आढळून आले. दागिने न सापडल्याने वेळोवेळी त्याच्याकडे वरील दागिने मागितले; मात्र त्याने तिघींनाही दागिने न देता त्यांची फसवणूक केली. यावरुन त्यांच्यात वादविवादही झाले. नंतर त्याने नोटरी करून हे दागिने देण्याचे कबुल केले. मात्र त्याने दागिने न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फाल्गुन पटेलविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार डी. व्ही. गाढवे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group