Nashik News : दहा रुपयांच्या वर्गणीवरुन नानावलीत युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
Nashik News : दहा रुपयांच्या वर्गणीवरुन नानावलीत युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जुने नाशिक परिसरामध्ये होणार्‍या एका कार्यक्रमासाठी वर्गणी न दिल्याने ४ जणांच्या टोळक्याने एका युवकावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना काल रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री जुने नाशिक परिसरातील नानावलीत  केवळ १० रुपयांच्या वर्गणीवरून सुरू झालेला किरकोळ वाद इतक्या टोकाला जाईल, अशी कल्पनाही उपस्थितांना नव्हती. फक्त वर्गणी वरून सुरू होता आणि तो मिटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण रजा फिरोज शेख (वय १७) या अल्पवयीन युवकावर टोळयाने एकत्रित येत थेट गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले.

हल्ला इतका जबरदस्त होता की, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रजाला नागरिकांनी तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉटरांनी प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे सांगितल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले आहे. रजाची स्थिती चिंताजनक असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे जुने नाशिक परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अल्ताफ शहा, नजिम शहा, फिरोज शहा व अयान शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group