ऑनलाइन शॉपिंगमध्ये बऱ्याचदा मागवलेली वस्तू न येता भलतीच काहीतरी वस्तू येते. शॉपिंग अप जर ट्रस्टेड असेल तर चुकीची आलेली वस्तू परत पाठवून तशी तक्रार दाखल करून जी वस्तू हवी होती ती मागवू शकतो. तशी तक्रार आपण करू शकतो. पण अनेकदा येथे गडबड देखील होते.
बंगळुरूमध्ये एका तरुणाने स्विगी इन्स्टामार्टवरून ५ ग्रॅम वजनाचं सोन्याचं नाणं ऑर्डर केलं होतं. मात्र, पॅकेट उघडताच त्याला मोठा धक्का बसला.कारण सोन्याच्या नाण्याऐवजी पॅकेटमध्ये थेट १ रुपयांचं नाणं आढळून आलं. या घटनेनंतर संबंधित तरुणाने संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या घटनेमुळे ऑनलाइन शॉपिंगच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. ग्राहकांनी अशा महागड्या वस्तू ऑनलाइन मागवताना अधिक सावधगिरी बाळगावी असं आवाहन आता सोशल मीडियावरून केलं जात आहे.