नाशिक : ...तर तुझ्या आईला जिवंत सोडणार नाही; धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
नाशिक : ...तर तुझ्या आईला जिवंत सोडणार नाही; धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिकमध्ये दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा अशाच प्रकारची घटना शिवाजीनगर येथे उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण करून तिचा विश्‍वास संपादन करून प्रेमाचे खोटे नाटक करून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे.

नांदूर नाका परिसरात तणावाचे वातावरण ; 'त्या' हल्ल्या प्रकरणी जखमी युवकाचा मृत्यू

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी अल्ताफ राजू शेख (वय २४, रा. नेहा अपार्टमेंट, गुलमोहर कॉलनी, शिवाजीनगर) याने फिर्यादी अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण केली. त्यानंतर तो मुलीला त्याच्या रिक्षात बसवून घरी घेऊन गेला. घरी गेल्यानंतर त्याने मुलीला “तुझ्यावर माझे प्रेम आहे व आपण दोघे लवकरच लग्न करू,” असे म्हणून वेळोवेळी तिच्याशी बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध निर्माण केले.

..तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक

याबद्दल कोणाला काही सांगितले, तर तुझ्या आईला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, तसेच शिवीगाळ करून पीडित मुलीवर वारंवार शारीरिक संबंध केले. त्यामुळे पीडिता ही गर्भवती राहिली आहे. हा प्रकार जानेवारी ते एप्रिल २०२५ या काळात शिवाजीनगर येथे घडला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अल्ताफ राजू शेख या रिक्षाचालकाविरुद्ध बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group