Nashik Crime : 15 लाखांचे 38 लाख देऊनही आणखी मागितले ५० लाख; जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासगी सावकारास अटक
Nashik Crime : 15 लाखांचे 38 लाख देऊनही आणखी मागितले ५० लाख; जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासगी सावकारास अटक
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- 15 लाख रुपयांवर विनापरवाना 50 लाख रुपयांची अवाजवी व्याजाची मागणी करून महिलेचा व तिच्या मुलीचा विनयभंग करून पतीला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन खासगी सावकारांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांचे दहिपूल परिसरात दुकान आहे. दरम्यान, फिर्यादी व त्यांच्या पतीने आरोपी खासगी सावकार कैलास कुंडलवाल व रोहित कुंडलवाल (दोघेही रा. उदय कॉलनी, मखमलाबाद रोड, पंचवटी) यांच्याकडून 15 लाख रुपये व्यवसायासाठी व्याजाने घेतले. या कर्जावर कुंडलवाल यांनी विनापरवाना अवाजवी व्याजाची मागणी करून व्याजापोटी आजपर्यंत 38 लाख रुपये घेतले आहेत; मात्र लाख रुपयांची मागणी करून फिर्यादीसह तिच्या पतीस जिवे मारण्याची धमकी दिली.

तसेच दि. 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आरोपी कुंडलवाल याने फिर्यादी यांच्या हुंडीवाला लेन येथील दुकानात येऊन व्याजाने घेतलेल्या रकमेची अवाजवी मागणी केली आणि फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग करीत धमकी दिली. हा प्रकार डिसेंबर 2022 ते दि. 13 मार्च 2025 या कालावधीत घडला. या प्रकरणी पीडित महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात खासगी सावकार कैलास कुंडलवाल व रोहित कुंडलवाल यांच्याविरुद्ध खासगी सावकारी, विनयभंग व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोहित कुंडलवाल याला अटक करण्यात आली आहे. 
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group