नाशिक : घरफोडीत १७ तोळे सोन्याचे दागिने लंपास
नाशिक : घरफोडीत १७ तोळे सोन्याचे दागिने लंपास
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून १७ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना पळसे येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. ३० ऑगस्ट रोजी फिर्यादी श्रीमती विमल सूर्यभान कुर्‍हे (वय ७०, रा. फुलेनगर, पळसे) या मुलाची तब्येत बरी नसल्याने सातपूर येथे त्याच्या घरी गेल्या होत्या. 

पुढील ४८ तास धोक्याचे ! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा

२ सप्टेंबर रोजी त्या दुपारच्या सुमारास घरी परतल्या असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांनी चोरी झाल्याचे लक्षात आले. 

मराठी ‘बिग बॉस सीजन ६’ला मोठे ग्रहण, प्रेक्षकांचा हिरमोड होणार?

अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घराच्या किचनमधील एका सुटकेसमध्ये ठेवलेले १ लाख ५ हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ३० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ४५ हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे जोड, ६० हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, २० ग्रॅम वजनाच्या ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पाच अंगठ्या, 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, 90 हजार रुपये किमतीच्या 30 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या असे एकूण 17 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.

 या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group