बिग बॉस हिंदीचे मागचे दोन सीजन फेल गेले असताना बिग बॉस सीजन १९ ला धमाक्यात सुरूवात झाली आहे. ज्यांच्या नावाची अगोदर कधी चर्चा देखील नव्हती, असे सेलिब्रिटी बिग बॉस मध्ये दिसत आहेत. हे सीजन हीट करण्यासाठी निर्मात्यांकडून प्रयत्न केली जात आहेत. काही रिपोर्टनुसार, बिग बॉसचे ही १९ वे सीजन तीन महिने नाही तर ५ महिने चालणार आहे. सलमान खान हाच या सीजनला होस्ट करत आहे.
बिग बॉस १९ चे सीजन ५ महिने चालणार असल्याचे कळाल्याने मराठी प्रेक्षकांचा हिरमोड झालाय. कारण बिग बॉस हिंदी संपल्यावर लगेचच किंवा हिंदीचे सीजन संपण्याच्या चार दोन दिवस अगोदर मराठी बिग बॉसला सुरूवात होते. मात्र, हे सीजन जर पाच महिने चालणार असेल तर मराठी बिग बॉस सीजन ६ प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हा प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. बिग बॉस मराठी सीजन ५ ने मोठा धमाका केला होता.
विशेष म्हणजे बिग बॉस मराठी ५ हे टीआरपीमध्येही धमाल करताना दिसले. बिग बॉस मराठी सीजन ५ ने अनेक रेकॉर्ड ब्रेक केली आहेत. चाहते मराठी बिग बॉसची आतुरतेने वाट पाहत आहेत.महेश मांजरेकर की रितेश देशमुख या दोघांपैकी मराठी बिग बॉसला कोण होस्ट करणार याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे. मात्र, याबद्दल अजून खुलासा हा होऊ शकला नाहीये.