“मी तर अनाथ मुलगीच बायको करणार” ;  बिग बॉसच्या घरात , नेमकं काय म्हणाला सुरज चव्हाण?
“मी तर अनाथ मुलगीच बायको करणार” ; बिग बॉसच्या घरात , नेमकं काय म्हणाला सुरज चव्हाण?
img
Dipali Ghadwaje
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सर्वात चर्चेत असणारा स्पर्धक म्हणजे सुरज चव्हाण. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींसह अनेकांचा पाठिंबा सुरज चव्हाणला मिळताना दिसत आहे.  सुरजचा खेळ सगळ्यांना आवडत आहे. अशातच ९ ऑगस्टच्या भागात सुरजने घरच्यांच्या आठवणीत जोडीदार कसा हवा? यासंबंधित भाष्य केलं. ९ ऑगस्टच्या भागात सुरज निक्की तांबोळी, घनःश्याम दरवडे आणि जान्हवी किल्लेकर बरोबर गप्पा मारत दिसला.

यावेळी त्याने घरच्यांच्या आठवणी सांगितल्या. आई, बाबांना आपण काय हाक मारायचो? आई बालपणी कशी सांभाळ करायची? हे सगळं सुरजने निक्की, घनःश्याम आणि जान्हवीला सांगितलं. यावेळी तो अनाथ मुलगीच बायको करणार, असं म्हणाला.

 सुरज नेमकं काय म्हणाला? 

सुरज म्हणाला, “आजी, आजोबा, पप्पा, मम्मी वरून बघतं असतील. मी पप्पांना आप्पा म्हणायचो. मी एकदम साध्या पद्धतीत आई, आप्पा अशी हाक मारायचो. आई शब्दात इतकी ताकद आहे, जी कोणामध्येही नाही. तिला इतकी माया आहे ना. मांडीवर घेऊन झोपवणं. लुली करत गाणी म्हणणं. डोक्यावर थापटणं. ते दिवस मला खूप आठवतात. उगाच मोठं झालो असं वाटतं. जन्म देऊन आपल्याला सोडून जातात हे मला खूप वाईट वाटतं. लगेच सोडून जायचं असेल तर जन्मचं द्यायचा नाही. कोणाचं पण मी सांगतो. आता बिचारे अनाथ असतात ते. मी तर अनाथ मुलगीच बायको करणार. मी पण अनाथ ती पण अनाथ. आता नशीबात अनाथ असलेली भेटली तर लय बरं होईल.” त्यानंतर निक्की सुरजला समजवतं म्हणते, “तुझं नशीब तू लिही. नशीब असं म्हणू नकोस. तुला जे हवं ते तुझं नशीब आहे. त्यामुळे तुच लिहायचं तुझं नशीब.”

इतर बातम्या
Join Whatsapp Group