‘बिग बॉसचा १९ वा सीझन नुकताच सुरू झाला आहे. अभिनेता सलमान खान हा शोचं सूत्रसंचालन करत आहे. प्रत्येक स्पर्धकाचं काही ना काही वैशिष्टय आहे. आणि त्यामुळे स्पर्धक चर्चेत असतात. बिग बॉसची अशीच एक स्पर्धक तिच्या आगळ्या वेगळ्या प्रयोशामुळे चर्चेत आली आहे. ती म्हणजे ग्वाल्हेरची उद्योजिका, इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल तान्या मित्तल.
तिचं घरातील वागणं, बोलणं आणि मतं सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. व्यवसायाबद्दलच्या काही योजना असोत किंवा तिच्या लाइफस्टाइलबद्दल ती सतत या शोमध्ये बोलताना दिसत आहे. बिग बॉस १९ ची तान्या मित्तल ८०० साड्या घेऊन रिअॅलिटी शोमध्ये प्रवेश करते. आणि ती म्हणते की 'प्रत्येक दिवसासाठी मी ३ साड्या नेसण्याचा निर्णय घेतला आहे.
तान्या काय म्हणाली?
तिच्या या निर्णयाबद्दल बोलताना तान्या म्हणाली, "मी माझ्या सुखसोयी मागे सोडत नाहीये, मी माझे दागिने, अॅक्सेसरीज आणि ८०० हून अधिक साड्या घरात घेऊन जात आहे. दररोज, मी ३ साड्या ठरवल्या आहेत, ज्या मी दिवसभर बदलत राहीन."