बिग बॉसच्या घरात अभिजीतने घातली साडी , फोटो पाहताच नेटकरी म्हणतात ;
बिग बॉसच्या घरात अभिजीतने घातली साडी , फोटो पाहताच नेटकरी म्हणतात ; "बाईSSS हा काय प्रकार....
img
Dipali Ghadwaje
बिग बॉस मराठीचा आठवा आठवडा फारच रंजक आहेत. गेल्या आठवड्यात आर्या आणि वैभव असे दोन सदस्य घराबाहेर गेल्याने आता फक्त १० सदस्य उरले आहेत. त्यामुळे हा खेळ दिवसेंदिवस कठीण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य टास्क नसताना मोकळ्या वेळेत मजा-मस्ती करताना दिसतात. 

नुकतंच बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीचा टास्क पार पडला आहे. दोन्ही टीममध्ये कॅप्टन्सी पदासांठी स्पर्धकांची दमदार खेळी पाहायला मिळाली.  अशातच आता अभिजीत सावंतचा हटके व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याने  सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर अभिजीत सांवतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंकिता अभिजीतचा मेकअप करताना दिसत आहे. तर जान्हवी अभिजीतला साडी नेसवताना दिसत आहे.


याचदरम्यान अरबाज अभिजीतला बघून ओ छम्मक छल्लो असे म्हणतो आहे. अशातच निक्की देखील पुढे येते आणि म्हणते , बाईssss...पुढे अरबाज आणि निक्की दोघेही अभिजीतकडे बघून हसतात.

यानंतर निक्की अभिजीतला खोटे केस लावताना दिसत आहे. तेव्हा अभिजीत म्हणतो, हे काय दिवस आले. पोरं म्हणतील, हे बापाचं काय झालंय? मग सर्व हसतात. अभिजीतचा हा भन्नाट लूक पाहून नेटकऱ्यांनी देखील हसायला येतं आहे. सोशल मीडियावर अभिजीतचा हा हटके व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group