बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू होऊन जवळपास ५० दिवस झाले आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून शोची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आजपासून आठव्या एपिसोडला सुरूवात झाली असून घरातील सर्वच स्पर्धकांचा खेळ अधिकच रंजक होताना दिसत आहे. आजच्या ‘भाऊच्या धक्का’वर रितेश थेट बिग बॉसच्याच घरात गेला आहे. रितेश देशमुख आज रविवारच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. मुख्य बाब म्हणजे, या आठवड्यातल्या नॉमिनेट स्पर्धकालाही रितेश बिग बॉसच्याच घरातून निरोप दिला आहे.
बिग बॉस मराठी 5'च्या घरातून एक सदस्य बाहेर पडणार आहे. रितेश देशमुख बिग बॉसच्या घरात येऊन एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव जाहीर करणार आहे. हा सदस्य कोण असेल, कोणाला निरोपाचा नारळ मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
'बिग बॉस' म्हटलं की नॉमिनेशनही आलं. ट्रॉफी जिंकण्यासाठी सदस्य एकमेकांचे पाय खेचताना दिसून येतात. त्यासाठी ते एकमेकांना नॉमिनेटदेखील करतात.
या आठवड्यात अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, वैभव चव्हाण आणि आर्या हे सदस्य नॉमिनेट झाले होते. यात आर्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढलंय.त्यामुळे आता अभिजीत, वर्षा, निक्की, अंकिता आणि वैभव यांच्यापैकी कोणाला घरचा आहेर मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.