''बिग बॉस मराठी 5'', 70 दिवसातच  संपणार, अधिकृत  माहिती आली समोर !
''बिग बॉस मराठी 5'', 70 दिवसातच संपणार, अधिकृत माहिती आली समोर !
img
दैनिक भ्रमर
'बिग बॉस मराठी  5 ने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे. जसजसा सिझन पुढे सरकत आहे . तसतसा बिग बॉस चा खेळ अजूनच रंगत चालला आहे. परंतु  याचदरम्यान, बिग बॉस चाहत्यांसाठी एक बातमी असून यामुळे चाहते नाराज होऊ शकतात. 

 बिग बॉस मराठीचा सीझन हा 100 दिवसांचा असतो. आत्तापर्यंत झालेले चारही सीझन 100 दिवसांचे होते. मात्र यंदाचा सीझन 70 दिवसांचाच असणार अशी चर्चा होती. सोशल मीडियावर याविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र आता यंदाचा बिग बॉस मराठी 5 चा सीझन 70 दिवसांचाच असणार आहे हे कन्फर्म झालं आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा अखेर खऱ्या ठरल्याचं समोर आलं आहे.

पाचवा सीझन १०० नव्हे तर ७० दिवसातच निरोप घेतोय. चॅनलकडून हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. चॅनलच्या वरिष्ठ अधिकारी सुगंधा लोणीकर यांनी ही माहिती कन्फर्म केली आहे. लोकमत फिल्मीशी बोलताना त्या म्हणाल्या, " होय. बिग बॉस ७० दिवसातच निरोप घेणार आहे. हा अचानक घेतलेला निर्णय आहे. याची कल्पना कोणालाच नव्हती. स्पर्धकांनाही आजच्या एपिसोडमध्ये ही माहिती देण्यात येणार आहे. तसंच शो इतक्या लवकर आटोपता घेण्याचं कारण लवकरच जाहीर करण्यात येईल."

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तशीही बिग बॉस लवकर संपणार असल्याची चर्चा सुरू होती. कारण सगळं पटापट सुरू होतं आणि सदस्यही एकापाठोपाठ लवकर घराबाहेर पडत आहेत. आता उरलेल्या सदस्यांपैकी कोण ट्रॉफीवर आपले नाव कोरणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group