‘बिग बॉस मराठी 5’  रितेश भाऊच्या धक्क्याने केली कमाल !  रचला नवा विक्रम
‘बिग बॉस मराठी 5’ रितेश भाऊच्या धक्क्याने केली कमाल ! रचला नवा विक्रम
img
दैनिक भ्रमर
‘बिग बॉस मराठी 5’ यंदा यंदाचा सीझन खूपच दमदार असून स्पर्धक रोज घरात कल्ला करताना दिसत आहे. सीझन सुरू झाल्यापासूनचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे. यंदाचा सीझन खूपच वेगळा असून बाकी सीझनपेक्षा अनेक हटके गोष्टी यंदा पहायला मिळत आहे. सर्वात पहिली लय भारी गोष्ट म्हणजे रितेश देशमुख यंदा सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. बिग बॉस मराठीने यंदा नवा विक्रम रचल्याचं समोर आलंय. हा नवा विक्रम काय आहे याविषयी जाणून घेऊया.

यंदाचा सीझनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा होस्ट रितेश देशमुख आहे. सोबतच यंदाचा आठवड्याची चावडीही बदलून भाऊचा धक्का झालीय. हे. रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला 3.7 रेटिंग मिळाले असून रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला 4.0 रेटिंग मिळाले आहे.

‘भाऊच्या धक्क्याला’ 3.9 एव्हरेज रेटिंग मिळाले आहे. ‘बिग बॉस मराठी’ने संपूर्ण आठवडा गाजवला आहे. खरंतर ‘बिग बॉस मराठी’ने स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकत ‘बिग बॉस मराठी’ने इतिहास रचला आहे.

दरम्यान, रोज बिग बॉस मराठी 5 चे अपडेट समोर येत आहे. तसेच, प्रत्येक सदस्याने वेगळी इमेज तयार केलीये. काहींना प्रेक्षकांचा सपोर्ट मिळतोय तर काही स्पर्धक खूप ट्रोल होत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group