‘बिग बॉस मराठी’आता लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा रंगणार आहे. त्यातच आता बिग बॉसच्या घरात एक मोठा ट्वीस्ट आल्याचे पाहायला मिळणार आहे. आज घरात खास बीबी पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी घरातील सदस्यांचं मनोरंजन करण्यासाठी खास डीजे क्रेटेक्स उपस्थित राहणार आहे. मात्र, या पार्टीनंतर सगळ्या स्पर्धकांना ‘बिग बॉस’कडून एक मोठा धक्का मिळणार आहे. आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मिड वीक एलिमिनेशन होणार आहे.सध्या सर्वांचेच लक्ष ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागाकडे लागले आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील कोणाचा प्रवास आज संपणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर असे सात सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’ जिंकल्यामुळे ती यंदाच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारी पहिली सदस्य ठरली आहे. तर, उर्वरित ६ सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. यांच्यापैकी एकाला आज ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. क्रेटेक्सच्या बीबी पार्टीनंतर घरात मिडवीक एलिमिनेशन होणार आहे.