‘बिग बॉस च्या घरातून बाहेर पडलेल्या अरबाज च्या गर्लफ्रेंडने घेतला ''हा'' मोठा निर्णय !
‘बिग बॉस च्या घरातून बाहेर पडलेल्या अरबाज च्या गर्लफ्रेंडने घेतला ''हा'' मोठा निर्णय !
img
दैनिक भ्रमर
‘बिग बॉस मराठी 5’  चा सिझन चांगलाच रंग आहे . भांडण तंटे , वादविवाद अशा अनेक कारणांवरून हा सिझन चर्चेत आहेच, पण या शो मधील सदस्य सुद्धा त्यांच्या स्वतःच्या पर्सनॅलिटी मुळे सुद्धा चर्चेत आहेत . दरम्यान , या सीझन मध्ये निकी आणि अरबाज चे एक वेगळेच बॉन्डिंग पाहायला मिळाले. त्यामुळे हि जोडी खूप चर्चेत होती .   

दरम्यान ,‘बिग बॉस मराठी 5’ च्या घरातून  अरबाज पटेल गेल्या आठवड्यात कमी मते मिळाल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडला आहे. अरबाज पटेल घरात असताना त्याचा आणि निकीच्या नात्यावरून दोघेही खूप चर्चेत होते. मात्र  तो घरात असताना जेवढा चर्चेत होता तेवढीच त्याची चर्चा बाहेर आल्यावरही सुरू आहे. दोघांच्या जवळीकीमुळे बाहेर प्रेक्षकांनी अरबाजला खूप ट्रोल केलं. कारण त्याची बाहेर एक गर्लफ्रेंड होती. नुकतीच तिनं केलेली पोस्ट इंटरनेटवर खळबळ उडवत आहे.

अरबाजची गर्लफ्रेंड लीझा बिंद्राने इन्स्टाग्राम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी तिनं पोस्ट शेअर केली. यामध्ये लीझा म्हणाली, “आपली स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आता वेळ वाया घालवायचा नाही.” पुढे ती म्हणाली, “माझा प्रवास तुमच्यासोबत इथपर्यंतच होता. तुमच्यासोबत खूप छान आठवणी आहेत. मी नेहमीच तुम्हाला सर्वांना आठवणीत ठेवेल आणि तुम्हीही मला विसरू नका, गुड बाय इन्स्टाग्राम फॅमिली.”

दरम्यान , अरबाज पटेल बिग बॉस बाहेर आल्यावरही निक्कीविषयी बोलत आहे. तो बाहेर आल्यापासून गर्लफ्रेंड लीझाला भेटला नाही. त्यामुळे लीझाला नेटकरी त्याची पोलिस तक्रार कर म्हणून सांगत आहेत. यावर लीझाने प्रतिक्रियाही दिली की “मला असं काही करायचं नाही. तुम्ही त्याला समजता तसा तो नाही, तो चुकीचा नाही.” याशिवाय लीझाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group