बिग बॉस मराठी सीजन 5 ने धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीपासून हा शो कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेचा विषय ठरला असून, दिवसेंदिवस अधिकच रंगतदार बनला. असं असतानाच मात्र, निर्मात्यांनी अचानक मोठा निर्णय घेत हे सीजन 70 दिवसांमध्येच संपवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान , बिग बॉसचे हे सीजन रंगात आलेले असताना आता बिग बॉसच्या निर्मात्यांवर प्रेक्षकांकडून अत्यंत गंभीर आरोप केले जात आहेत. प्रेक्षकांकडून हे आरोप केले जात आहेत. सूरज चव्हाण याच्याकडे मुद्दाम निर्माते हे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे. अभिजीत सावंत याला विजेता करायचे असल्यानेच निर्माते हे सूरज याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे.
सूरज चव्हाण हा जवळपास सर्वच आठवड्यांमध्ये नॉमिनेशनमध्ये जातो. प्रेक्षक त्याला मोठ्या प्रमाणात मदत करत सुरक्षित करतात. हेच नाही तर सूरज चव्हाण याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. सूरज चव्हाण हाच बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता होईल असेही सातत्याने सांगितले जातंय. घरात सर्वात प्रामाणिक सदस्य सूरज चव्हाण हाच असल्याचे सांगितले जातंय.
बिग बॉसच्या निर्मात्यांना अभिजीत सावंत किंवा अंकिता वालावलकर यांच्यापैकी एकालाच बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता करायचा असल्यानेच ते सूरज चव्हाण याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हेच नाही तर त्याला साधे फुटेजमध्ये जास्त दाखवले देखील जात नसल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. लोक अनेक गंभीर आरोप हे निर्मात्यांवर करताना दिसत आहेत.