“निक्की ही आहे तुमची जागा”, रितेश देशमुखने निक्कीला चांगलंच झापलं ; दिली सर्वात मोठी शिक्षा
“निक्की ही आहे तुमची जागा”, रितेश देशमुखने निक्कीला चांगलंच झापलं ; दिली सर्वात मोठी शिक्षा
img
Dipali Ghadwaje
‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या बराच गाजत असून या शोमध्ये निक्की तांबोळी बरीच चर्चेत असते. पहिल्या दिवसापासूनच तिचे काही ना काही उद्योग सुरू असतात. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आज रितेश देशमुख ‘गणपती विशेष भाऊचा धक्का’ घेणार आहे. रितेश आज कोणाची कानउघडणी करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं. अखेर घरात केलेली चुकीची वक्तव्यं, अन्य स्पर्धकांचा अपमान आणि घरात काम करण्यास दिलेला नकार या सगळ्या गोष्टींसाठी रितेशने निक्कीला खडेबोल सुनावले आहेत.

तिने आधी  वर्षा उसगांवकरांचा अपमान केला, नंतर अजून काही राडे… मात्र त्यावर घरातल्या सदस्यांनी देखील वेळोवळी योग्य स्टँड घेऊन तिला खडसावलं. पण तरीही निक्कीचे उद्योग काही थांबत नाहीत. आता ‘भाऊच्या धक्क्यावर’ रितेश देशमुखने निक्कीला चांगलंच झापत तिची कानउघडणी केल्याचं पहायला मिळालं. आज रितेश देशमुख ‘गणपती विशेष भाऊचा धक्का’ घेणार आहे. त्यामध्ये त्याने निक्कीला थेट सुनावलं.

आठवडाभर घरात केलेली चुकीची वक्तव्य, उगाच वाद घालणं, घरातलं कोणतंही काम करण्यास दिलेला नकार या निक्कीच्या वागण्यामुळे प्रेक्षक चांगलेच संतापले होते. आता रितेश देशमुख यानेही तिला यावरून खडेबोल सुनावत तिची खरडपट्टी काढली. “कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही… अशा प्रकारची तुमची दादागिरी मी खपवून घेणार नाही” असं म्हणत रितेशने निक्कील मोठी शिक्षा देत चांगलीच अद्दल घडवली आहे.

भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला झापलं. तो म्हणाला, ‘दरवेळेस तुम्हाला इतरांचा बाप काढायचा असतो. आता बिग बॉस मराठीच्या संपूर्ण सीझनमध्ये तुम्हाला कॅप्टन होता येणार नाही, हीच तुमची शिक्षा ‘ असं म्हणत रितेशने तिला शिक्षा सुनावलीये. कॅप्टन्सीच्या शर्यतीतून निक्कीला बाद करण्यात आल्याने तिला मोठा धक्का बसला. कॅप्टन्सी मिळणार नसल्याने तिला इम्युनिटीलाही मुकावं लागणार आहे.

निक्कीला मिळणार आणखी शिक्षा ?

एवढंच नव्हे तर निक्कीला आणखी एक शिक्षा मिळू शकते. प्रोमोमध्ये रितेश निक्कीला हातवारे करून उठा सांगतो आणि तिला बाजूला एक लहानसा टेबल देण्यात येतं. त्यावरून रितेश देशमुख निक्कीला भाऊच्या धक्क्यावरून उठवणार असल्याची सध्या सुरू आहे. त्याचा उलगडा आजच्या भागात होईल. “निक्की ही तुमची जागा… मी गेल्या आठवड्यात तुमचं कौतुक केलं. कधीपण कौतुक मनात ठेवायचं असतं, कारण, कौतुक जेव्हा डोक्यात जातं तेव्हा त्याची हवा होते.. आणि एकदा डोक्यात हवा गेली की, आपला स्वत:वरचा कंट्रोल सुटतो. आपल्यात माज येतो आणि आपणं वाट्टेल तसं वागतो, वाटेल तसं बोलतो. या आठवड्यात निक्की तुम्ही तेच केलं.” असं म्हणत रितेशने तिला आठवड्याभरातील तिच्या कृत्यांची आठवण करून देत तिची खरडपट्टी काढली.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group