बिग बॉस मराठी च्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झालेली राधा पाटील (मुंबईकर) सध्या चर्चेत आली आहे. राधा पाटील ही डान्सर आहे. गौतमी पाटीलशी कायम तिची तुलना होत असते. गावागावात राधाचेही डान्स शो गाजतात. तसंच तिने काही म्युझिक व्हिडीओही केले आहेत. आता बिग बॉस मुळे ती आणखी प्रसिद्धीझोतात आली आहे. बिग बॉसच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये राधाने तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केला आहे.
राधा पाटील गेली काही वर्षे तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. अनुश्री सुद्धा राधाच्या बॉयफ्रेंडची फॅन आहे असं ती यावेळी म्हणाली. पण, त्याचं नाव नेमकं काय आहे हे प्रेक्षकांना समजलेलं नाही. नावाचा उल्लेख टेलिकास्ट करताना म्युट करण्यात आला आहे.
राधा पाटील म्हणाली, “आम्ही २ BHK मध्ये राहतो, आमचा बेडरूम वेगळा आहे आणि बाकी मुलींसाठी वेगळी खोली आहे. आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. त्याचा स्वभाव असा आहे ना… मला जरा कोणी काही बोललं तर, तो कोणालाच ठेवणार नाही. त्याला काहीच व्यसन नाहीये. ३ वर्षे झाली आता…तो कधीच स्वत:च्या हाताने जेवला नाहीये. तो नेहमी माझ्याच हाताने जेवलाय. ( मी त्याला भरवते ) त्यामुळे आता मला राहून-राहून वाटतंय…मी इथे आल्यावर त्याचं काय होत असेल? कसं होत असेल? मुलींची अशी एक इच्छा असते ‘देसी बॉय’ पाहिजे. अगदी तसाच तो आहे.”
राधा पुढे म्हणाली, “आता शोमध्ये हे सगळे ( अन्य स्पर्धक ) मला इतके बोलतात…तो इथे असता तर एवढ्यात मारून वगैरे निघून गेला असता.” यावर अनुश्री राधाला सांगते, “आता मला पण एखादा बॉयफ्रेंड शोध”, राधाच्या बॉयफ्रेंडविषयी अनुश्री पुढे म्हणते, “मी फॅन आहे त्याची…म्हणजे मी तुझीही फॅन आहे. पण, मला त्याचं अमुक एक गाणं खूप आवडतं.”
यावर राधा पुढे म्हणाली, “तुला माहितीये का? आम्ही जेव्हा फिरायला जातो…तेव्हा माझ्याबरोबर कोणी फोटो काढत नाही पण, त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी खूप गर्दी होते. लोक वेडे आहेत त्याच्यासाठी…पण, तो माझा हात कधीच सोडत नाही. आता आम्हाला ३ वर्षे झाली…असं कधीच वाटलं नाही की, आमच्यापैकी एकाचं प्रेम तरी कमी झालंय…कारण, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मी खूप ओरडते, चिडचिड करते…तरीही तो सगळं सहन करतो. आता त्याची आठवण आल्यावर मला खूप रडायला येतंय” यानंतर शेवटी राधाने अनुश्रीला तिच्या बॉयफ्रेंडचं पूर्ण नावही सांगितलं…हे नाव एपिसोड टेलिकास्ट दरम्यान म्युट करण्यात आलं आहे.