नाशिक : जादा नफ्याचे आमिष भोवले; तिघांना ४० लाखांचा गंडा
नाशिक : जादा नफ्याचे आमिष भोवले; तिघांना ४० लाखांचा गंडा
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : शेअर्स व आयपीओमध्ये चांगले रिटर्न्स मिळतील, असे भासवून दोघांनी मिळून तीन जणांची 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी व इतर तक्रारदार यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अंकिता घोष नामक व्यक्तीने अ‍ॅड केले. या ग्रुपवर शेअर ट्रेडिंग व गुंतवणुकीविषयी माहिती देऊन अधिक परतावा कसा मिळेल, हे सांगितले जाईल, असा मेसेज तिने टाकला. नंतर तिने एक लिंक पाठवून फिर्यादीला एक बनावट ट्रेडिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. या अ‍ॅपच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टॉक व आयपीओमध्ये चांगले रिटर्न मिळवून देण्याचे भासवीत तिने विविध कंपन्यांचे शेअर्स व आयपीओ घेण्याकरिता फिर्यादीसह आणखी एकाकडून विविध बँक खात्यांवर 32 लाख 69 हजार 437 रुपये भरण्यास भाग पाडले. 

ठाणे ते मुंबई CST सर्व लोकल सेवा आणि ट्रेन रद्द, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

त्यानंतर नाशिकरोड येथे आणखी एका इसमाला असेच आमिष दाखवून दिलेल्या बँक खात्यांवर 7 लाख 75 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. तिघेही तिच्या आमिषाला बळी पडल्याने त्यांनी वेळोवेळी तिला एकूण 40 लाख 44 हजार 437 रुपये दिले. हा सर्व प्रकार 22 जुलै ते 14 ऑगस्ट 2025 या काळात घडला. आपल्याला कोणताही परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिघांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group