बापरे ! होणारा नवरा पसंत नव्हता म्हणून तरुणीने रचला भयंकर कट,  नेमकं काय घडलं ?
बापरे ! होणारा नवरा पसंत नव्हता म्हणून तरुणीने रचला भयंकर कट, नेमकं काय घडलं ?
img
दैनिक भ्रमर
आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत आहे. आजकाल कोणत्या कारणावरून काय घडेल याचा काही नेम नाही. अतिशय अशा शुल्लक अशा कारणांवरून देखील गंभीर प्रकारचे गुन्हे घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

 होणारा नवरा पसंत नसल्यामुळे तरुणीने हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. होणारा नवरा पसंत पडला नाही म्हणून तरुणीने गुंडांना दीड लाख रुपयांची सुपारी देऊन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 27 फेब्रुवारीला दौंड तालुक्यातील खामगाव येथील गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यवत पोलिसांनी याप्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे.

होणारा नवरा सागर कदम हा हॉटेलमध्ये कुक असून सागर आणि मयुरी दांडगेचं लग्न होणार होतं, पण मयुरीला सागर पसंद नव्हता, त्यामुळे तिने सागरला जीवे मारण्याची सुपारी दिली. मयुरीने सागरची हत्या करण्यासाठी गुंडांना दीड लाख रुपयेही दिले.

मयुरीकडून सुपारी घेतल्यानंतर गुंडांनी सागरला दौंड तालुक्यातील खामगाव फाटा या ठिकाणी अडवलं आणि तू मयुरीशी लग्न केलं तर तुला दाखवतो, अशी धमकी दिली. यानंतर त्यांनी सागरला लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. मारहाणीमध्ये सागर थोडक्यात बचावला, यानंतर त्याने यवत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनीही गुन्हा दाखल करत पाच आरोपींना अटक केली, पण मयुरी दांडगे या घटनेनंतर फरार आहे.

दरम्यान , सागर यांना मारहाण झाल्यानंतर आम्ही एक-दोन संशयीत ताब्यात घेतले, त्यामध्ये आदित्य दांगडे (राहणार अहिल्यानगर, श्रीगोंदा) याची चौकशी केली. या चौकशीदरम्यान एका मुलीला लग्नासाठी आलेला वर आवडत नसल्यामुळे, तसंच त्याच्याशी लग्न करायचं नसल्यामुळे आणि त्याने लग्नाला नकार द्यावा यासाठी तरुणीने दीड लाख रुपयांची सुपारी दिली. यानंतर आरोपींनी सागर यांना मारहाण केली. याप्रकरणातले सगळे आरोपी अहिल्यानगरच्या श्रीगोंदामधील आहेत. आरोपींनी सागरला मारहाण केल्याचं कबूल केलं आहे. एकूण सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, पण ज्या मुलीने हा कट केला ती अद्याप फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group