मुंबई उडविण्याची धमकी देणारा अखेर 'तो' अटकेत
मुंबई उडविण्याची धमकी देणारा अखेर 'तो' अटकेत
img
वैष्णवी सांगळे
गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईला बॉम्बस्फोटाची गंभीर धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एक अज्ञात मेसेज पाठवण्यात आला होता. या मेसेजमध्ये दावा करण्यात आला की, 14 पाकिस्तानी अतिरेकी मुंबईत पोहोचले असून, 34 गाड्यांमध्ये 400 किलो आरडीएक्स लपवण्यात आले आहे. 

या स्फोटांमुळे जवळपास 1 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा करण्यात आला होता. आता धमकीचा मेसेज पाठवणार्‍यास पोलिसांनी नोएडा येथून अटक केली आहे.  धमकीच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी नोएडा पोलिसांशी संपर्क साधला. नोएडा पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक केली. 

आरोपीचे नाव अश्‍विनी असल्याचे समोर आले असून, तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे आणि मागील 5 वर्षांपासून नोएडामध्ये वास्तव्यास आहे. नोएडा पोलिसांनी अश्‍विनीला अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त करून तपास सुरू केला आहे.  धमकीचा संदेश मिळताच मुंबई पोलीस, अँटी टेरर स्क्वॉड, सायबर सेल आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी तात्काळ कारवाई केली.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group