खळबळजनक बातमी..! मुंबईतील ६० हॉस्पिटलला धमकीचे ईमेल ; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
खळबळजनक बातमी..! मुंबईतील ६० हॉस्पिटलला धमकीचे ईमेल ; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईमधील ६० हॉस्पिटलला धमकीचे मेल  आले आहेत. यापूर्वी मीरा-भाईंदर येथील हॉस्पिटलला धमकीचा मेल आला होता. त्यानंतर अशाच पद्धतीचा धमकीचा मेल मुंबईतील ६० नामांकित हॉस्पिटलला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान या सर्व हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी धाव घेतली असून पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. हे धमकीचे मेल नेमके कुठून आले, कोणी पाठवले, दहशतवादी संघटनांनी तर पाठवले नाही ना? सर्व बाजूने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या धमकीचमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ९.३० ते १० च्या सुमारास मीरारोडच्या वॉकार्ड हॉस्पिटलला धमकीचा मेल आला होता. त्यानंतर आता मुंबईतील ६० हॉस्पिटला धमकीचा मेल आले आहेत. हे सर्व मुंबईतील मोठे आणि नामांकित हॉस्पिटल्स आहेत. रुग्णालयात स्फोटकं असल्याची माहिती या धमकीच्या मेलद्वारे देण्यात आली आहे. 

दरम्यान श्वान पथकासह पोलिसांनी या हॉस्पिटल्समध्ये धाव घेतली असून त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. धमकीचा मेल आल्याची पुष्टी पोलिसांनी दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group