मुंबई : मुंबईतून आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध ताज हॉटेलच्या परिसरात एकाच नंबरप्लेटच्या दोन कार आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये चेक इन केलं जात असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार , कुलाबा पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. दोन्ही कार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. कारच्या चालकांची चौकशी सुरु आहे. MH 01 EE 2388 अशा नंबर प्लेट दोन्ही गाड्यांवर दिसल्या. कारच्या चालकांची चौकशी सुरु आहे. ताज हॉटेल आणि परिसर मुंबईतील अतिसंवेदनशील भाग समजला जातो. त्या ठिकाणी असा प्रकार घडल्यानं पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेल लक्ष्य करण्यात आलेलं होतं. त्यानंतर हा भाग मुंबईतील अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. आज हॉटेलमध्ये चेक इन केलं जात असताना MH 01 EE 2388 अशा नंबर प्लेट असलेल्या पांढऱ्या रंगाच्या दोन कार आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यंत्रणा अलर्ट झाल्या असून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.